Monday, February 10, 2025
Homeताज्या घडामोडीनुकतेच लोकार्पण झालेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवराचा गेट पडला

नुकतेच लोकार्पण झालेल्या प्रबोधनकार ठाकरे सरोवराचा गेट पडला

१९ कोटी रुपये खर्च करून केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणमध्ये प्रबोधनकार ठाकरे सरोवराच्या नुतानीकरणाचे लोकार्पण बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होऊन काही तास उलटत नाही तोच या सरोवराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील लहान लोखंडी गेट पडल्याची घटना घडली.

विविध प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी कल्याण शहरात आले होते. यावेळी नुतनीकरण करण्यात आलेल्या प्रबोधनकार सरोवराचे देखील लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कल्याणात कार्यक्रमाला आल्याने कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सरोवराच्या नुतानिकारांच्या लोकार्पणला काही तास उलटत नाहीत, तोच मुख्य प्रवेशद्वारा जवळील लहान गेट मोडून पडला आहे.

तसेच या लोकार्पणाच्या दोन दिवस आधी येथे ओपन जिम चे साहित्य देखील तुटले होते. १९ कोटी खर्च करून सरोवराच्या नुतनीकरणाचे काम केले होते. मात्र कोटींचा खर्च करून देखील अशी घटना घडत असेल तर या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -