Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

प्रेमदिनाचा प्रेमसंदेश

प्रेमदिनाचा प्रेमसंदेश
  • साईश्रद्धा: विलास खानोलकर

साई म्हणे मुलांनो माझे ऐका पुलवामाच्या शहीद सैनिकांचे ऐका गलवान व्हॅली शहिदांचे ऐका चीन-पाकला द्या जोरात धक्का ।। १।।

आई-बाबा पहिला प्रेमळ एक्का आजी-आजोबा दुसरा एक्का पणजी पणजोबा तिसरा एक्का शालेय गुरू चवथा एक्का।।२।।

शिर्डी साईबाबा पृथ्वीचा बादशहा दत्तगुरू साऱ्या ब्रह्माडांचाच बादशहा शिवशंकर कैलासाचा बादशहा देवाधिदेव स्वर्गाचा प्रेमळ बादशहा ।।३।।

प्रेमळ भाऊबहीण खरे शहेनशहा उत्तम निर्व्यसनी मित्र खरे शहेनशहा स्वामीसमर्थ अक्कलकोटचे शहेनशहा गजानन महाराज शेगावचे शहेनशहा।।४।।

करा नोकरी प्रामाणिक चाकरी करून धंदा ठेवा सेवेकरी भरपूर धनधान्य उत्तम शेतकरी प्रामाणिक पणाची बरी दूध-भाकरी।।५।।

जगण्याचे आहे प्रेमळ टेक्निक आकशातील देव त्याचा मॅकेनिक तो गाडी चालवेल ठाकठीक वेळेवर काम करा सांभाळ ठीकठीक।।६।।

योगासनाने संभाळा हृदयाची टीकटीक भरपूर व्यायामाने करा स्नायू ठाकठीक सोडा व्यसने तब्येत ठाकठीक सोडा तंबाखू ठेवा शरीर ठाकठीक।।७।।

चाला भरपूर सैनिकासारखे टॉकटॉक राहा ताठ काढू नका पॉक शिकवा गरीब मुले देऊनी फळा चॉक चाला पहाटे करा बागेत वॉक।।८।।

करा निसर्गावर भरपूर प्रेम करा पशू-पक्ष्यांवर भरपूर प्रेम वाचवा नदीनाले करा प्रेम वाचवा झाडेझुडपे करा प्रेम ।।९।।

गाईगुरे शेळी बकरी करा प्रेम नका कापू माणूसप्राणी द्या प्रेम सत्य अहिंसा परमोधर्मा प्रेम बायको-मुले-नातू निरंतर प्रेम।।१०।।

साऱ्या जगावर करा प्रेम साऱ्या धर्मावर करा प्रेम प्रत्येक श्वासावर करा प्रेम प्रत्येक क्षणावर करा प्रेम ।।११।।

सुगंधी गुलाबाने वाटा प्रेम सुगंधी सोनचाफ्याने वाटा प्रेम विष्णुप्रीय तुळशीने वाटा प्रेम सोनटक्क्याने १०० टक्का प्रेम ।।१२।।

वाचवा सारी पृथ्वी करा प्रेम वाचवा, डोंगर हिरवे करू प्रेम गाई देऊन चारा करा प्रेम चिमणी-कावळा दाणापाणी करा प्रेम।।१३।।

vilaskhanolkardo@gmail.com
Comments
Add Comment