कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण पूर्व नांदिवली चिंचपाडा गाव येथील ५ अनधिकृत जोते व २ मोठ्या गोडाऊन्सवर निष्कासनाची धडक कारवाई केली.
हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग व फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांचे मदतीने आणि १ जे.सी.बी. व ५ कामगार यांच्या सहाय्याने करण्यात आली.
आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही कारवाई केली.