भिवंडी: भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील नोबेल इंग्लिश हायस्कूल मधील १२वीच्या १० विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट फी दिलेली नसल्याने रोखल्याचे शाळेत मनविसेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी फोनवर स्पष्ट आदेश देऊनही शाळा प्रशासन हॉल तिकीट न देण्यावर ठाम असल्याने मनविसेने ठिय्या आंदोलन सुरू केले.
मनविसे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पालक व विद्यार्थी सोबत मनविसेचे जिल्हा सचिव हर्षल भोईर, ऍड सुनील देवरे, तालुका सचिव सूरज पाटील, मिलिंद तरे, मयूर तारमले यांनी सहभाग घेतला.