१. थायलंड येथील सुमारे ११० भिक्खूंचा संघ तसेच त्यासोबत भारतातील भिक्खू संघ आणि हजारो धम्म उपासकांसह बुद्धांच्या अस्थी घेऊन परभणी येथून शहरात आले होते.
२. यावेळी ‘बुद्धम् सरणम् गच्छामि, धम्मम् शरणम् गच्छामि, संघम् शरणम् गच्छामि’च्या घोषाने वातावरण बुध्दमय झाले. मोठ्या संख्येने उपासकांनी या कलशाचे दर्शन घेतले.
३. शहरातील मुख्य रस्त्यावर रांगोळीसह फुलांचा वर्षाव करीत जागोजागी धम्मपदयात्रेचे धम्म उपासकांनी अभूतपूर्व स्वागत केले.
४. याप्रसंगी उपासकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत सकाळपासून अस्थिकलश आणि पदयात्रेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
५. थायलंडहून भगवान बुद्धांच्या अस्थी घेऊन आलेले ११० बौद्ध भिक्खू मुंबईतील चेंबूर येथे भगवान बुद्धांना आदरांजली अर्पण करण्यासाठी चैत्यभूमीकडे निघाले असता, हजारो बौद्ध भाविकांनी त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. (छायाचित्र अरुण पाटील)