नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयकर विभागाने बीबीसीवरील सर्व्हे बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या दिवशीही देखील सुरूच ठेवले होते. बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात आयकर विभागाच्या पथकाने मंगळवारी धडक दिली होती.
मात्र हे सर्वेक्षण दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले. आयटी अधिकारी २०१२ पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासत असून कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप-डेस्कटॉप जप्त करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे, बीबीसीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेलद्वारे सहकार्य करण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे द्यावे, असे सांगण्यात आले आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. अनेक तासांपासून अधिकारी लॅपटॉप आणि कागदपत्रांची छाननी करत आहेत.