नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचेही विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. आझम खान यांचे ऑक्टोबर २०२२ मध्ये विधानसभेचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आले होते. त्यानंतर आता आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान याचे विधानसभेचे सदसत्त्व रद्द करण्यात आले आहे.
यूपी विधानसभा सचिवालयाने अब्दुल्ला आझम यांची जागा रिक्त घोषित केली आहे. मुरादाबाद येथील विशेष न्यायालयाने सपाचे सरचिटणीस आझम खान आणि त्यांचा आमदार मुलगा अब्दुल्ला आझम यांना १५ वर्षे जुन्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
अब्दुल्ला आझम खान रामपूरच्या सुआर मतदारसंघातून आमदार होते. मात्र, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला शिक्षेच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाते.