Wednesday, July 9, 2025

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण

जितेंद्र आव्हाड ऑडिओ क्लिप प्रकरण


ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाण्यात याचे पडसाद उमटले आहेत. या क्लिपनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास ठाणे महापालिका मुख्यालयाच्या गेटजवळ ठामपा अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे, तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले असल्याची कबुली देणारी कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ठाणे महानगर पालिकेतील अधिकारी महेश आहेर यांचा हा आवाज असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.



त्यानंतर आज सायंकाळी हा मारहाणीचा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलींना मारण्याची धमकी देतो का? असे विचारत त्यांना जबर मारहाण करताना दिसत आहेत.


काही वेळानंतर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस पालिका मुख्यालयात दाखल झाले आणि त्यांनी पोलीस संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा