नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्की आणि सीरियानंतर आता न्यूझीलंड भूकंपाने हादरले आहे. या भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती. न्यूझीलंडच्या वायव्येकडील शहर लोअर हट येथे भूकंपाचे धक्के बसले आहेत.
हा भूकंप पारापरामुच्या वायव्येस ५० किमी अंतरावर आल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र ५७.४ किलोमीटर खोल होते. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडमधील लोअर हटपासून अंदाजे ७८ किमी अंतरावर भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती दिली आहे.