Sunday, August 31, 2025

भाजपा आमदार नितेश राणे उद्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

भाजपा आमदार नितेश राणे उद्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

सायंकाळी सिंधुदुर्ग वासियांचा स्नेहमेळावा; कोकणवासियांची सदिच्छा भेट घेणार

पुणे : भाजपचे युवा आमदार नितेश राणे उद्या (गुरुवारी) पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कोकण वासियांची सदिच्छा भेट घेणार आहेत. आमदार राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अभय संभाजी पाताडे हे या दौऱ्याचे संयोजक आहेत.

दुपारी ३ वा. परशुराम प्रभू (थेरगाव) सिंधुलक्ष्मी पतसंस्था चेअरमन यांची भेट, ३ ते ४ सिंधुदुर्ग भवन (डांगे चौक) कार्यालयाला भेट, ४ ते ४.३० यशवंत गावडे (विभाग प्रमुख, वाल्हेकरवाडी ) भेट, ४.३० ते ५ अरविंद पालव, संस्थापक, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ भेट, ५ ते ५. ३० अॅड. चंद्रकांत गायकवाड, सेक्रेटरी दुर्गा माता मंदिर आरती (काळेवाडी) भेट, ५.३० ते ६.३० दीपक राणे, (विभाग प्रमुख, रहाटणी) भेट, ६.३० ते ७ नंदकिशोर सावंत (विभाग प्रमुख, सांगवी) भेट तर ६ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ स्नेह मेळावा (स्थळ : न्यु मिल्लेनियम इंग्लिश मेडियम स्कुल, समर्थ नगर, नवी सांगवी कर्मवीर भाऊराव पाटील रोड, पिंपळे गुरव, पुणे) असा त्यांचा दौरा असणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अभय संभाजी पाताडे यांनी दिली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >