Thursday, July 10, 2025

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू

कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईत कुर्ला परिसरात एका इमारतीला आज सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे इमारतीतील ६ मजले आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. या भीषण आगीमध्ये शकुंतला रमाणी या ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून ही भीषण आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गजबलेल्या कुर्ला भागामध्ये ही घटना घडली आहे. आज सकाळी ६ वाजून ५६ मिनिटाच्या सुमारास प्रिमियम कंपाऊंड मधील कोहिनूर सिटी येथील बिल्डींग क्रमांक ७ च्या चौथ्या मजल्यावर अचानक इमारतीला आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोन इमारतीच्या दहाव्या मजल्यापर्यंत पसरले. भीषण आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.


दरम्यान, इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करून त्यांना इमारतीच्या टेरेसवर हलवण्यात आले आहे.
Comments
Add Comment