Sunday, July 7, 2024
Homeमहत्वाची बातमीराज्यातील शाळांचे रूपडे बदलणार!

राज्यातील शाळांचे रूपडे बदलणार!

केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील सर्व शाळांचे पूर्ण स्वरूप बदलण्याबाबतचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील शाळांचे पूर्ण स्वरूपच बदलणार असून केंद्र सरकारची पीएमश्री योजना राज्यात देखील लागू करण्यात येणार आहे. आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर २०२२ मध्ये या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत देशात १४ हजार ५९७ शाळा सुरु करण्यात येणार आहे. आदर्श शाळा म्हणून या शाळा ओळखल्या जातील असे सांगितले जात आहे. देशातील १८ लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायजिंग इंडिया’ महाराष्ट्रात राबवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंत्रीमंडळामध्ये खलबते झाली.

अशी आहे पीएमश्री योजना…

  • या शाळेत नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ आणि आधुनिक पायाभूत सुविधा यावर विशेष लक्ष देण्यात येईल.
  • शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, राज्यातील साक्षरतेचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल.
  • विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठीही उपायोजना सुचवल्या जातील.

मंगळवार १४ फेब्रुवारी २०२३ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

• राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार

• धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार. १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना लाभ

• डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा अध्यादेश काढणार

• महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत

• पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता. ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

• पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण

  • छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा.
  • जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.
  • सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -