Sunday, July 7, 2024
Homeमहत्वाची बातमीस्वतःवर प्रेम करा...

स्वतःवर प्रेम करा…

फेब्रुवारी महिना सुरू झाला की, तरुणांना वेध लागतात ते वेगवेगळे डेज साजरा करण्याचे, त्यासाठी ते जय्यत तयारीही करतात. ‘रोज डे’पासून सुरू झालेला हा डेज महोत्सव ‘व्हॅलेंटाइन डे’ला संपतो.

आज १४ फेब्रुवारी… व्हॅलेंटाइन डे, प्रेमाचा दिवस. म्हणून हल्ली सगळीकडे साजरा केला जातो. प्रेमीयुगुल या दिवशी आपली प्रेमभावना व्यक्त करतात. पण प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी अशा एका ठरावीक दिवसाचीच निवड का बरे व्हावी! माझ्या मते तर अजिबातच नाही. हा एक दिवस प्रेमाचा नसावा कारण प्रेम हे अथांग सागराप्रमाणे व पृथ्वीसारखी विशाल आणि भव्यदिव्य कल्पना आहे. त्याचे वर्णन, शब्दांकन करणे म्हणजेच टिटवीने समुद्र उपसण्याचा निष्फळ प्रयत्न करणे होय.

गुलाबी प्रेमाचा गुलाबी दिवस, गुलाबी प्रेमाचा, गुलाबी फुलांचा बोला किंवा आनंदाला उधाण आणणारा. मग काय फक्त एकच दिवस असतो का हो प्रेमाचा? मुळात प्रेम म्हणजे काय हो? प्रेम मनात असतं, बसतं, फुलतं, फुलवतं, खरं तर बहरतं. अत्तराच्या कुपीसारखं नजरेत ओथंबत. राग अनुरागे होते. तरीही मोरपंखी रंगाने सजले ते प्रेम, इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी स्वप्न झुल्यावर झुलते ते प्रेम. भावनेच्या ओलाव्यात भिजत ते प्रेम. फक्त व्हॅलेंटाइन डेचा एक दिवस प्रेम उधळून नंतर काय? खऱ्या प्रेमाला तर अपेक्षाच नसते. ते व्यक्त करायला साहित्य लागत नाही. फक्त लागतात ती दोन हृदय, दोघांची नजरानजर! बस इतकच पुरी सुखदुःखाची खरी साथ तीही लाखमोलाची आयुष्यभरासाठीची.

खरे प्रेम म्हणजे भावना, तळमळ, भावविश्व, नाजूक बंध, रेशीमगाठी असं सुंदर नातं. प्रेम म्हणजे सुंदर दागिना. सहज सुंदर तळमनाचा घेतलेला ठाव, अंतरीचा कब्जा घेणं, आपलं न उरणं म्हणजे प्रेम. दुसऱ्याचं होऊन जाणं, दुसऱ्यात हरवून जाणं म्हणजे प्रेम. प्रेम एक सुंदर बंधन, पवित्र नातं, नाजूक वेल, अतूट धागा. प्रेम ही भावनाच मुळी व्याकुळ करणारी. वाट पाहायला लावणारी, निरपेक्ष, नि:स्वार्थ, निखळ, निरागस, हवीहवीशी दुर्मीळ ही प्रेमभावना. तो खरेपणा एकमेकांचं होऊन एकमेकांना जपणे, एकमेकांना अर्पण करणे, समर्पण होणे म्हणजे प्रेम. जीवापाड जीव लावून जीवासाठी जोडणं म्हणजे प्रेम, ते जगायला शिकवतं आणि मरायलाही शिकवतं. या प्रेमावर मंगेश पाडगावकर म्हणतात, त्याने प्रेम केलं, तिने प्रेम केलं… करू दे की! मला सांगा त्यात तुमचं काय गेलं? पण आजकालचे प्रेम हे इन्स्टंट प्रेम म्हणजे लगेच कोणावरही प्रेम बसायला लागले आहे आणि ब्रेकअपही लगेच व्हायला लागले आहेत. त्यामुळे पूर्वीची प्रेमाची संकल्पना आता पाहायला मिळणार नाही.

जसा महिलांचा सन्मान फक्त जागतिक महिला दिनीच नव्हे, तर वर्षभर व्हायला हवा. तसेच प्रेमही वर्षभर व्यक्त केले पाहिजे. प्रेम हे शारीरिक आकर्षणापेक्षा वेगळे असून ते व्यक्त करण्याचे संस्कार बालपणापासून प्रत्येकाच्या मनावर केले पाहिजेत. १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे संपूर्ण जगात प्रेमाचं, मैत्रीचं आणि परस्पर कौतुकाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. खरंतर हे प्रेम स्त्री-पुरुषांचे, मित्र-मैत्रिणीचं, पशुपक्ष्यीयांचं किंवा आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, सजीव प्राणी किंवा सृष्टी याबाबतची सुखद भावना करणार असू शकतं.

प्रेम… प्रेम म्हणजे काय असतं. जगातील अत्युच्च भावना. मंगेश पाडगावकर भलेही म्हणत… प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. पण प्रत्येकालाही ते खरंच खास असतं. पाहा ना… ती किंवा तो एका नकळत्या क्षणी मनात उतरतात… कोणतीही एक व्यक्ती खूप पटते, कोण जाणे, पण मनात तिचं असणं कोरलं जातं आणि खूप जन्माचं नातं असल्याची जाणीव मनात घर करत जाते. ती व्यक्ती आपलीशी व्हावी आणि हा जन्म तिच्याबरोबर जावा असं वाटत राहतं. अर्थात जगण्याचा आनंद द्विगुणित करणारा शब्द म्हणजे प्रेम… फक्त प्रेम.

खरं तर प्रेमाची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी. म्हणजेच या दिवसाच्या निमित्ताने आपण स्वतःवर भरभरून प्रेम करूया. हा दिवस आपल्याला खरं-खुरं प्रेम करणाऱ्या माणसासोबत साजरा करूया. कोरोना काळात माणसाने माणुसकीच्या प्रेमाचा प्रत्यय दिला. हे प्रेम असंच वृद्धिंगत होऊ देऊया. मात्र कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळात प्रेमाचं महत्त्व नव्याने अधोरेखित झाला आहे. प्रेमाची व्याख्या फक्त प्रेमी युगलापुरती मर्यादित नाही तर प्रेम ही खूप उदात्त अशी भावना आहे. कोरोनाच्या काळात माणसाचं माणुसकीवरच प्रेम प्रकर्षाने दिसून आलं. या अत्यंत कठीण आणि संघर्षाच्या काळात लांबवरचे आप्त स्वकीय पोचू शकत नसताना शेजाऱ्यापाजाऱ्यांनी, मैत्रिणींनी दिलेला आधार….

– रसिका मेंगळे 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -