Wednesday, July 9, 2025

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणात मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? याचे उत्तर आज मिळणार आहे.

साहजिकच या एका गोष्टीवर केसच्या निकालाचं वेळापत्रकही अवलंबून असणार आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे गेले तर आणखी वेळ लागेल. जर सध्याच्या घटनापीठाकडे राहिले तर मग सलग सुनावणी तातडीने सुरु होणार का याची उत्सुकता असणार आहे. या अगोदर दोन न्यायमूर्तींचं व्हेकेशन बेंच, त्यानंतर त्रिसदस्यीय पीठ, मग पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ आणि आता जर कोर्टाने विनंती मान्य केली तर सात न्यायमूर्तींचं बेंच असेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा