Tuesday, May 13, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधना ठरली पहिली कोट्याधीश

महिला प्रीमियर लीगमध्ये स्मृती मानधना ठरली पहिली कोट्याधीश

मुंबई: पहिल्या महिला प्रीमियर लीग (WPL) साठी खेळाडूंचा लिलाव मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सुरू झाला आहे. या लिलावात सर्वात पहिल्यांदा स्मृती मानधानाला बोली लागली. स्मृती मानधना हिला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने ३.४ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे.


पहिल्या सेटचा लिलाव झाला असून दुसऱ्या सेटच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. दीप्ती शर्माला यूपी वॉरियर्सने २.६ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. त्याचवेळी रेणुका सिंगला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १.५ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. दुसरीकडे, यूपीने ताहिलिया मॅकग्राला १.४० कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे. बेथ मुनीला गुजरातने २ कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतले आहे.





या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यापैकी संघ जास्तीत जास्त ९० खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करेल. भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर होती. कारण ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही सांभाळू शकते. तसेच ती जगभरातील महिला क्रिकेट लीग्समध्ये खेळली आहे.

Comments
Add Comment