Sunday, June 22, 2025

‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉन संपन्न

‘रन फॉर लेप्रसी’ मॅरेथॉन संपन्न

ठाणे(प्रतिनिधी) : सहाय्यक संचालक, आरोग्यसेवा(कुष्ठरोग), ठाणे सेवा(कुष्ठरोग), ठाणे व आरोग्य विभाग महानगरपालिका भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने "रन फॉर लेप्रसी" मॅरेथॉनचे सोमवार, दि. १३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनला सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ़ बुशरा सय्यद मॅडम व डॉ़ भागवत दहिफळे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षकीय नागरी कुष्ठरोग ठाणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला.


सदर मॅरेथॉनचा शिवाजी चौक, वंजारपट्टी नाका, एसटी स्टँड, हसिना टॉकीज मार्गे महानगरपालिका इमारत येथे समारोप करण्यात आला. महानगरपालिका सभागृह येथे दीप प्रज्वलन करून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर बक्षीस वितरण उपआयुक्त दीपक पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विजेत्यांना मेडल, पारितोषिक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास उपायुक्त प्रणाली घोंगे यांचे मार्गदर्शन लाभले. महानगरपालिका माध्यमिक शिक्षण अधिकारी मोमीन निहाला, महानगरपालिका क्रीडा अधिकारी शरद कलावंत, जिल्हा पर्यवेक्षक(कुष्ठरोग), महेश निकुभ व कुष्ठरोग विभाग कर्मचारी विठ्ठल शेळकंदे, दत्तू चव्हाण, किसन ढेरे, रविनाथ जावळे(वैद्यकीय सहाय्यक), शहर क्षयरोग कर्मचारी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिकांचा या ‘रन फॉर लेप्रसी’ला चांगला प्रतिसाद लाभला.

Comments
Add Comment