
मुंबई: १४ फेब्रुवारी तुम्ही व्हॅलेंटाईन डे म्हणून उत्साहात साजरा करणार असाल. अर्थातच हा दिवस इतरांबद्दल प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्यासाठीच प्रसिद्ध आहे. या दिवशी अनेकजण प्रेमाचे संदेश देऊन कार्ड, फुले किंवा चॉकलेट एकमेकांना पाठवतात. परंतू १४ फेब्रुवारी म्हणजे फक्त व्हॅलेंटाईन डे इतकीच याची ओळख आहे का?


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आर्थिक साक्षरता सप्ताह
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 2016 पासून दरवर्षी वित्तीय साक्षरता सप्ताह (FLW) साजरा करतो. यामध्ये देशभरात एखाद्या विशिष्ट थीमवर आर्थिक साक्षरता संदेश प्रसारित केला जातो. चालू वर्षासाठी निवडण्यात आलेल्या थीममध्ये आर्थिक बचत आणि नियोजन तसेच डिजिटल वित्तीय सेवांचा योग्य वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन
१४ फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय पुस्तक आदान-प्रदान दिन म्हणूनही साजरा केला जातो. पुस्तकांचे आदान-प्रदान व वाचनाची आवड वाढविण्याच्या दृष्टिने या दिवसाचे विशेष महत्व आहे.
[caption id="attachment_436830" align="alignnone" width="650"]
ग्रंथालय प्रेमी दिन
ग्रंथालयप्रेमी, ग्रंथपाल, ग्रंथप्रेमी यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी ग्रंथालय प्रेमी दिन देखील साजरा केला जातो.