Wednesday, April 23, 2025
Homeमनोरंजनझी मराठीवर येतेय, 'तुला शिकवीन चांगलाच धडा!'

झी मराठीवर येतेय, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा!’

तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि चर्चा सुरू झाली ती हृषिकेश शेलार आणि शिवानी रांगोळे या जोडीची, ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. सोबतच या मालिकेच्या निमित्ताने अजून एक सरप्राइझ प्रेक्षकांसाठी असणार आहे ते म्हणजे हृषिकेश आणि शिवानी सोबत कविता लाड-मेढेकर आणि विजय गोखले हेदेखील मध्यवर्ती भूमिकेत असणार आहेत. कविता लाड आणि विजय गोखले बऱ्याच काळानंतर डेलिसोपमध्ये दिसणार आहेत.

ही मालिका आहे एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भश्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्त्वनिष्ठ मुलगी आहे तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे, शिक्षण फक्त प्रगती करत नाही, तर चरित्र घडवते. तुमच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करते, असं तिचं म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्वीकारलं, तर दुसरीकडे मालिकेचा नायक अधिपतीचे अनेक व्यवसाय आहेत. त्याच्या मालकीची एक शाळादेखील आहे. पण त्याने नववीनंतर शिक्षण सोडलं, कारण त्याच्या आईचे म्हणणे आहे की, शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही. शिक्षण हे गरिबांसाठी असतं, त्यामुळे त्यांना नोकरी लागते, अधिपतीसाठी शिक्षण कधीही त्याच्या आड आलं नाही, कारण त्याने अनेक व्यवसाय यशस्वीपणे केले आहेत. अधिपतीचं आईवर खूप प्रेम आहे. अधिपती अक्षराच्या प्रेमात पडला. पण मनातून खूश नसूनही आईने त्या दोघांचं लग्न लावून दिलंय.

कोल्हापुरात होणाऱ्या या मालिकेचं लेखन केलंय मधुगंधा कुलकर्णी हिने, तर मालिकेचे दिग्दर्शक आहेत, चंद्रकांत गायकवाड. शर्मिष्ठा राऊत या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही. शाळेत मास्तरीण आणि घरात कारभारीण, पाठ होईल का याला संसाराचा पाढा… नवी मालिका “तुला शिकवीन चांगलाच धडा” ही मालिका १३ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -