'बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है’, ‘अगर ये तुझे प्यार करती हैं तो यह पलट के देखेगी. पलट... पलट..!’ या एव्हरग्रीन डायलॉग्सने सजलेला ‘डीडीएलजे’ म्हणजेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट प्रेक्षक आजही आवडीने बघतात. आता व्हॅलेंटाइन वीकच्या निमित्ताने डीडीएलजे चित्रपट पुन्हा रूपेरी पडद्यावर रिलीज करण्याचा निर्णय यशराज फिल्म्सने घेतला असून याबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करूनही माहिती सिनेप्रेमींना दिली आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलीस या चित्रपटगृहांमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाचे खेळ शुक्रवार १० फेब्रुवारीपासून पुढील एक आठवडा थिएटरमध्ये पाहता येणार आहेत. १९९५ मध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट रिलीज झाला. आता २८ वर्षे झाली आहेत. हा चित्रपट आदित्य चोप्राने दिग्दर्शित केला. निर्मिती यशराज फिल्मने केली असून चित्रपटात शाहरुख खानने राज ही भूमिका साकारली, तर काजोलने सिमरन ही भूमिका साकारली तसेच या चित्रपटात अमरीश पुरी, फरीदा जलाल, अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आता हा चित्रपट पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
व्हॅलेंटाइन वीकनिमित्त ‘डीडीएलजे’चे खास शोज
February 12, 2023 01:30 AM 87
Comments
संबंधित बातम्या
आणखी वाचा >