Thursday, September 18, 2025

वेदांतने पाच सुवर्णपदके जिंकली, लेकाच्या कामगिरीने भारावला आर माधवन

वेदांतने पाच सुवर्णपदके जिंकली, लेकाच्या कामगिरीने भारावला आर माधवन

भोपाळ (वृत्तसंस्था) : ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन याचा मुलगा वेदांत याने सुवर्ण कामगिरी केली आहे. वेदांत याने या स्पर्धेत पाच सुवर्ण व दोन रौप्य अशी एकूण सात पदके जिंकली. अभिनेता आर. माधवन याने ट्वीट करत आपल्या लेकाचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात १६१ (५६,५५,५०) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. वेदांत माधवन याने उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांत सात पदके जिंकली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांचा समावेश आहे. आर. माधवन याने ट्वीट करत आपल्या लेकाचे कौतुक केले आहे. माधवन याने स्वत:च्या मुलासोबतच या स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या अपेक्षा फर्नांडिस हिचेही कौतुक केले. त्यासोबतच कोच आणि इतर स्टाफचेही कौतुक करायला माधवन विसरला नाही.

Comments
Add Comment