Monday, June 16, 2025

आसामच्या नागाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

आसामच्या नागाव जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

आसाम (वृत्तसंस्था): आसामच्या नागाव जिल्ह्यात आज दुपारी ४.१८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.० मोजण्यात आली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ही माहिती दिली. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.





यापूर्वी गुजरातमधील सुरत जिल्ह्यात ३.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च (ISR) च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपाची नोंद सकाळी १२.५२ वाजता सुरतपासून पश्चिम नैऋत्येस सुमारे 27 किमी अंतरावर होती.

Comments
Add Comment