Saturday, October 18, 2025
Happy Diwali

पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत, मुलाला नोकरीही

पत्रकार वारीशेंच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत, मुलाला नोकरीही

रत्नागिरी (वार्ताहर) : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर शिक्षण घेत असलेल्या वारीशे यांचा मुलगा यश यालाही कायमस्वरूपी नोकरी घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पत्रकार वारिशे यांच्या मृत्यूप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी एसआयटी चौकशीची घोषणा केली. आता वारीशे यांच्या कुटुंबाला सरकारने रविवारी मदतीची मोठी घोषण केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा