नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अधयक्ष राज ठाकरे यांच्याबाबत एक सुचक वक्तव्य केले आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बावनकुळे यांनी राज यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली असल्याचं चित्र आहे.
नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या समारोपानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, राज ठाकरेंना वाटेल तेव्हा ते भाजपसोबत युती करु शकतात. राज ठाकरे यांचा मोदींवर विश्वास असून त्यांच्यासाठी आमचे दार खुलेच आहे असेही ते म्हणाले. आगामी निवडणुका पाहता बावनकुळेंच्या या वक्तव्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यावेळी पुढे बोलताना, भाजपमध्ये गद्दारांना नव्हे तर, इमानदारांना थारा आहे. राज ठाकरे हे प्रगल्भ नेते असून खुलेपणाने बोलतात. मनात एक आणि ओठावर एक असे त्यांचे नसते, अशा शब्दात बावनकुळे यांनी राज यांचे कौतुकही केले. यावेळी राज यांच्यासोबत आमची कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…