मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. तसेच रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच महागात पडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. राज्यपाल कोश्यारी यांनी नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं पदाचा राजीनामा दिला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झालाय.
आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर रमेश बैस येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे.