Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीराजकीयमहत्वाची बातमी

महाविकास आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात, उदय सामंतांचा दावा

महाविकास आघाडीतील २० ते २२ आमदार संपर्कात, उदय सामंतांचा दावा

सोलापूर : येत्या महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला खिंडार पडण्याचे चित्र आहे. उद्योगमंत्री उदय सामंत महाविकास आघाडीतील तब्बल २० ते २२ आमदार संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा केलाय. ते माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यापुढे येणारं महापालिका, लोकसभा अथवा विधानसभेचे मैदान असो, सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.


आघाडीमधील १० ते १२ आमदार आमदार बच्चू कडू यांच्या संपर्कात आहेत. तर ८ ते १० आमदार माझ्या संपर्कात असल्याचं उद्य सामंत यांनी सांगितलं आहे. तसेच, राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी, असंही सामंत यावेळी म्हणाले.


टेंभुर्णीमध्ये शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.

Comments
Add Comment