मुंबई: चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सामाजिक उत्तरदायित्व पथकाने बृहमुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित केलेली वॉल पेंटिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
दादर चौपाटीवर आयोजित ही स्पर्धा सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु होती. नर्चर नेचर ही थीम असलेल्या स्पर्धेतून विविध रेखाचित्रांनी पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी सकारात्मक संदेश दिला. या स्पर्धेचे परीक्षक प्रसिद्ध कलाकार गौरव भाटकर यांनी केले.