केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जोरदार प्रहार
पुणे : संजय राऊत यांना कुठल्याही प्रकारची धमकी आलेली नाही. ते काही राज्याचे मोठे नेते नाहीत, ते बदनाम आहेत, सामना चालत नाही म्हणून ब्रेकिंगसाठी ते प्रयत्न करतात आणि खासदार विनायक राऊत हे तर सिंधुदुर्गाला लागलेली कीड आहे, अशी खोचक टीका केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
पुढे ठाकरे गटाच्या शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसेनेवाले आई-वडिलांना विसरले. कसबापेठ आणि पिंपरी चिंचवडची जागा आम्ही मताधिक्याने जिंकणारच आहोत. विरोधकांना आम्ही धुराड्यासारखे उडवणार आहोत, असे म्हणत पिंपरी-चिंचवड आणि कसबापेठ निवडणूक भाजप जिंकणार, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.
‘कसबा व चिंचवड भाजपच जिंकणार’
‘आम्ही विकास केला आहे, केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना महाराष्ट्रात राबवल्या जात आहेत. दोन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात बोलावले. केंद्राने महाराष्ट्राला मोठा निधी दिला. त्यात चुकीचे काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केले, हे त्यांनी सांगावे. तेव्हाचे मुख्यमंत्री मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत केवळ अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का?’ असा सवाल करत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत मोदींच्या मुंबई दौऱ्यांवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही उत्तर दिले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नऊ महिन्यामध्ये मूल होते, पण राज्यात सहा महिने होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, “मूल होण्याची आणि विस्ताराची प्रोसेस काय आहे ते अजित पवारांना माहिती आहे, त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केले त्याची चौकशी सध्या सुरू आहे, सत्य समोर येईलच. तसेच मुले जन्माला घातल्यानंतर नाव ठेवण्याचा अधिकार हा बापाला असतो, आम्ही विकास केला, त्यामुळे मोदींचे राज्यात दौरे वाढत आहेत, अशी टीकाही यावेळी राणेंनी विरोधकांवर केली.
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत बोलताना नारायण राणे यांनी “कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटिनिवडणुकीच्या जागा भाजप मोठ्या मताधिक्क्याने जिंकणार आहे. विरोधक धुळीसारखे उडणार आहेत. भाजप ग्रामपंचायत ते लोकसभा सर्व निवडणुका गांभीर्याने घेतो.” असेही नारायण राणे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यू प्रकरणावरून संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप व विधाने केली आहेत. शिवाय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवले आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे जे घडले आहे ते का घडले, कशामुळे घडले ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. राऊतांची मी दखल घेत नाही. ते काय महाराष्ट्राचे मोठे नेते नाहीत.” असेही नारायण राणे यावेळी म्हणाले.
शिवसेनेला त्यांचे निवडणूक चिन्ह मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच राणे म्हणाले, मी काय भविष्य सांगू का? सांगतो. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह गमवावे लागणार व ते चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नऊ महिन्यामध्ये मुल होतं पण, राज्यात सहा महिने होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका केली होती. त्यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, “मुल होण्याचे आणि विस्ताराचा प्रोसेस काय आहे ते अजित पवारांना माहिती आहे, त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केले त्याची चौकशी सध्या सुरू आहे, सत्य समोर येईलच. तसेच मुले जन्माला घातल्यानंतर नाव ठेवण्याचा अधिकार हा बापाला असतो, आम्ही विकास केला, त्यामुळे मोदींचे राज्यात दौरे वाढत आहेत, अशी टीकाही यावेळी राणेंनी विरोधकांवर केली.