Categories: रिलॅक्स

विद्यार्थी हीच माझी प्रेरणा : चित्रकार शंकर सोनावणे

Share

सुप्रसिद्ध चित्रकार शंकर सोनावणे हे मूळचे चेंबूर येथील. ते एस. एस. एम. शिवाजी विद्यालय अभ्युदय नगर काळाचौकी मुंबई येथे कला शिक्षक म्हणून १९९३ पासून कार्यरत आहेत. ‘विद्यार्थी हीच प्रेरणा’ घेऊन जगणारे आणि जहांगीर आर्ट गॅलरी हेच देवालय मानणारे चित्रकार सोनावणे आपल्या आयुष्यातील अनेक रंगसंगतींचा, कला अदाकारींचा वेध घेतात. चित्रकलेच्या प्रांतात हरखून जातात. कला हीच ईश्वरासमान मानून चित्रकलेचा ध्यास घेताना शब्दाशब्दांतून उलगडत जातात.

ते सांगतात, ज्यावेळी मी प्रथम मॉडेल आर्ट (दादर) येथे प्रवेश घेतला, त्यावेळी खूप चांगल्या मित्रांचा सहभाग लाभला आणि मी झोपडपट्टीत राहात असल्यामुळे मला यानिमित्ताने एक नवा जन्म लाभल्यासारखे वाटले. प्रथमच मित्र मला जहांगीर आर्टला घेऊन गेले, त्यावेळी तिथले वातावरण पाहून मला क्षणभर स्वर्गात आल्यासारखे वाटले. चित्रकलेचा ध्यास चेंबूर (टिळक नगर) येथे सरस्वाती विद्यामंदिर हायस्कूलमध्ये असताना कला शिक्षक शरद कुलकर्णी व रमेश मेस्त्री सरांमुळे, करिअरच्या दिशेने प्रवास घडविणारा ठरला. यानिमित्ताने चेंबूर ते जहांगीर आर्ट गॅलरीचे नाते गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून अनामिकपणे जोडले गेले. यातूनच ख्यातनाम नावीन्य अनुभवता आले. डिजिटल आर्ट मांडणी शिल्प व अमूर्त शैली असे रोजच नवीन पाहायला मिळत असे. महान चित्रकार होण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. त्याग, तपश्चर्या आणि विपश्यना आणि सतत काम यातून वाढणारी एकाग्रता ही आपणास आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविण्यास मदत करते. पण आताच्या काळात डिजिटल आर्टमुळे ती शक्यता मला तरी कमी वाटते. ते सांगतात, महान चित्रकार एकतर मी स्वतःला कधीच म्हणवून घेत नाही. कारण त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्याग करावा लागतो. मी सतत पेंटिंगचे प्रदर्शन व स्पर्धेत भाग घेत असतो आणि त्यास सन्मान होत असतो म्हणून चाहते बोलत असतात. त्यामुळे नकळतच प्रेरणा मिळते.

सोनावणे यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, कोणतीही कला असो, डिग्री लागते. काही वर्षे डिग्री हा प्रकार नव्हताच, पण अनेक कलामहर्षी महान कलाकार झाले. आताच्या काळात खूप प्रमाणात बदल होत गेला आणि बेसिक म्हणून डिग्री असणं गरजेचं आहे किंवा इतर ठिकाणी काहीतरी करिअर करू शकतो म्हणून आज डिग्री असणे गरजेचे झाले आहे. ज्याच्याकडे डिग्री नाही पण कला आहे, अशा कलाकरांसाठी बंधन असे काही नाही. प्रोफेशनल फुलटाइम कला क्षेत्रात अनेक विभाग आहेत. त्या ठिकाणी डिग्रीची आवश्यकता नाही आणि तो चांगल्या प्रकारे राहू शकतो तोही महान कलाकार होऊ शकतो, असे सोनावणे सांगतात. चित्रकला जगवताना साधलेली कलाकृती म्हणजे चित्रच. आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा असल्याचे सोनावणे यांनी सांगितले.

सोनावणे आपल्या आवडत्या चित्रकाराविषयी सांगतात, आवडता चित्रकार म्हणजे पाब्लो चिकासो. एम. एफ. हुसेन, प्रभाकर कोलते, वासुदेव कामत, सुहास बहुलकर, प्रफुल्ला डहाणूकर मॅडम, अतुल दोडिया, रामजी शर्मा, कृष्णाचारी बोस, जतिश कलाट आकण ज्यांनी मला घडवलं ते म्हणजे रमेश मेस्त्री इत्यादी. आपलं वय ५३ आणि ड्राइंगही ५३०० अशा उद्दिष्टांबद्दल बोलताना सोनावणे सांगतात, असं कामाला मोजमाप काही नसतं. कलाकार शेवटपर्यंत काम करित असतात. उदा – एम. एफ हुसेन, राम सुतार हे शिल्पकार वय वर्षे ९४ पर्यंत आहेत.

आजवरच्या काळामध्ये भरवलेली चित्रकलेची प्रदर्शने ही इंटरनॅशनल मुंबई अशा अनेक नामवंत गॅलरीमध्ये भरविली आहेत आणि अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रदर्शने भरविली आहेत. डिजिटलच्या दुनियेत चित्रकला ही रसिकांपर्यंत आपल्या ब्रशचे फटकाऱ्यांनी जागवायाला हवी. स्वच्छ भारत सर्वेक्षणात प्रत्येक भिंतीवर हाताने पेंटिंग केले जाते आणि त्याला लोकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत असतो. दरम्यान आपण आज ज्या उंचीवर पोहोचलो आहोत त्याचे सारे श्रेय हे एस. एस. एम. शिवाजी विद्यालय आणि संस्थापक मुख्याधापिका शिक्षिका, कर्मचारी आणि पालक यांच्या आशीर्वादामुळेच असल्याचे ते सांगतात.

सोनावणे यांना मिळालेले अ‍ॅवॉर्ड

  • २००१ साली ऑल इंडिया कॅम्लिन आर्ट फाऊंडेशनचे शंकर सोनावणे यांना ॲवॉर्ड मिळाले आहेत.
  • २००५ साली शिल्पकलेला राज्य पुरस्कार बॉम्बे आर्ट सोसायटी ज्युरी ॲवॉर्ड.
  • शिल्पकलेला जपानमध्ये कॅटलॉग सिलेक्शन अ‍ॅवॉर्ड.
  • राष्ट्रीय कला प्रदर्शन, ललित कला अकादमी दिल्ली पेटिंगची निवड. आतापर्यंत कलाक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १०० हून अधिक पुरस्कार.
  • विविध कलाक्षेत्रांत अनेक गोल्ड मेडल सतत प्रत्येक कला प्रदर्शनात व स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

12 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

1 hour ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago