मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आणि चित्रपट निर्माती आलिया सिद्दीकी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगना म्हणते की तिला नवाजुद्दीन सिद्दीकीबाबत फार वाईट वाटतेय. आता नवाजुद्दीन बद्द्ल कंगनाला वाईट वाटायचं कारण काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने नवाजुद्दीनवर विश्वासघात केल्याचा आरोप करत त्याला घराबाहेर काढले आहे.
कंगना लिहिते, नवाज साहेबांचा अपमान होताना पाहुन अत्यंत वाईट वाटतंय. त्यांना त्यांच्या घराबाहेर काढण्यात आलं आहे. नवाज यांनी आपलं सर्वस्व कुटुंबाला दिलं, कित्येक वर्षं ते भाड्याच्या ठिकाणी राहिले, टीडब्ल्यूएस या त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटसाठी ते रिक्षाने गेले. गेल्या वर्षीच त्यांनी हा बंगला विकत घेतला होता आणि आता त्याची माजी पत्नी त्यावर हक्क सांगायला आली.
तिने असेही लिहिले की, ” नवाज यांनी आजपर्यंत जे काही कमावले, ते त्यांनी आपल्या भावांना दिले, त्यांनी त्यांच्या पत्नीला अनेक वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता, ते मुलांचा एकत्र सांभाळ करत होते. ती दुबईत मुलांसोबत राहत होती, त्याने तिच्यासाठी मुंबईत फ्लॅटही विकत घेतला होता… आणि नुकताच त्याने त्याच्या आईसाठी एक बंगला खरेदी केला होता, त्याने माझ्याकडून होम डिझायनिंगच्या अनेक टिप्स घेतल्या, आम्ही खूप आनंदी होतो, आम्ही एकत्र या घरात हाऊस वॉर्मिंग पार्टीही केली होती .”
काय आहे नेमकं प्रकरण?
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यात सुरू झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. दरम्यान, आलियाने १० फेब्रुवारीला नवाजचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. ज्यामध्ये ती घराच्या आत आहे, तर नवाज गेटजवळ उभा राहून तिच्याशी बोलत आहे. व्हिडिओमध्ये आलिया नवजावर संतापलेली दिसत आहे.
View this post on Instagram
आलियाने नवाजविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये तिने आपल्या मुलाची आणि नवाजची डीएनए चाचणी करावी, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी नवाजच्या आईने दावा केला होता की, तो मुलगा नवाजचा नाही. व्हिडिओ शेअर करताना आलियाने एक लांबलचक नोट लिहित नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.