Sunday, June 29, 2025

वंदे भारत ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचा अभिमान

वंदे भारत ट्रेन म्हणजे आधुनिक भारताचा अभिमान

मुंबई: वंदे भारत ट्रेन म्हणजे आजच्या आधुनिक भारताचा अभिमान आहे. आतापर्यंत १० वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे देशभरात सुरू झाल्या आहेत. एकूण १७ राज्यातील १०८ जिल्हे या ट्रेननी जोडले गेले आहेत, या शब्दांत वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईवासियांना संबोधित केले.


पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. ते म्हणाले, रेल्वेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे. देशाला आज नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आज देशात आधुनिक रेल्वे सुरु करण्यासोबतच मेट्रोचा विस्तार केला जात आहे. नवीन विमानतळे आणि बंदरे तयार केली जात आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सरकारतर्फे १० लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांच्या (इंफ्रास्ट्रक्चर) विकासासाठी देण्यात आले आहेत.



पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना साद


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मला मुंबईच्या लोकांना विशेष माहिती द्यायची आहे की, अर्थसंकल्पात मध्यवर्गीयांना मजबूत करण्यात आलं आहे. पगारी लोकं असो की व्यापारी, दोघांनाही या अर्थसंकल्पाने खूश केलं आहे. यूपीए सरकार ज्या उत्पन्नावर २० टक्के कर घ्यायची ते भाजपा सरकारने करमुक्त केलं.

Comments
Add Comment