नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुरू असलेली सुनावणी १४ मार्च पर्यंत पुढे ढकलली आहे. आधी कोर्टाच्या वेबसाईटवर २१ मार्च तारीख दाखवली जात होती. परंतु आता सुनावणी १४ मार्चला होणार आहे.
यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार का, याबाबत शंका निर्माण झाली आहे. राज्यातील २७ महानगरपालिकांपैकी २३ महापालिकेची मुदत याआधीच संपलेली असून उर्वरित ४ महापालिका यामध्ये सांगली-मिरज महापालिकेची मुदत १९ ऑगस्ट २०२३ रोजी, जळगाव महापालिकेची मुदत १७ सप्टेंबर २०२३ रोजी, अहमदनगर महापालिकेची मुदत २७ डिसेंबर २०२३ रोजी तर धुळे महापालिकेची मुदत ३० डिसेंबर २०२३ रोजी संपणार आहे.
महाराष्ट्रातील खालील २३ महापालिकांची मुदत संपली आहे…
१) मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली आहे. महापालिकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.
२) ठाणे महापालिकेची मुदत ५ मे २०२२ रोजी संपली आहे.
३) नवी मुंबई महापालिकेची मुदत ८ मे २०२० रोजी संपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
४) कल्याण-डोंबिवली महापालिकेची मुदत १० नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
५) पुणे महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
६) पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
७) नाशिक महापालिकेची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
८) औरंगाबाद महापालिकेची मुदत २८ एप्रिल २०२० रोजी संपली आहे.
९) नागपूर महापालिकेची मुदत ४ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
१०) पनवेल महापालिकेची मुदत ९ जुलै २०२२ रोजी संपली आहे.
११) वसई-विरार महापालिका मुदत २७ जून २०२० रोजी संपली आहे.
१२) कोल्हापूर महापालिका मुदत १५ नोव्हेंबर २०२० रोजी संपली आहे.
१३) भिवंडी-निजामपूर महापालिका मुदत ८ जून २०२२ रोजी संपली आहे.
१४) उल्हासनगर महापालिका मुदत ४ एप्रिल २०२१ रोजी संपली आहे.
१५) मीरा-भाईंदर महापालिका मुदत २७ ऑगस्ट २०२२ रोजी संपली आहे.
१६) नांदेड महापालिका मुदत ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी संपली आहे.
१७) सोलापूर महापालिका मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
१८) परभणी महापालिका – १५ मे २०२२ रोजी संपली आहे.
१९) अमरावती महापालिका मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
२०) चंद्रपूर महापालिका मुदत २८ मे २०२२ रोजी संपली आहे.
२१) अकोला महापालिका मुदत ८ मार्च २०२२ रोजी संपली आहे.
२२) मालेगाव महापालिका मुदत १३ जून २०२२ रोजी संपली आहे.
२३) लातूर महापालिका मुदत २१ मे २०२२ रोजी संपली आहे.
२४) अहमदनगर महापालिका – २७ डिसेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.
२५) धुळे महापालिका – ३० डिसेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.
२६) जळगाव महापालिका – १७ सप्टेंबर २०२३ रोजी मुदत संपणार.
२७) सांगली-मिरज महापालिका – १९ ऑगस्ट २०२३ रोजी मुदत संपणार.