मुंबई: तुम्हाला चॅट जीपीटी माहिती असेल पण तुम्हाला गीता जीपीटी माहितेय का? होय आता गीता तत्वज्ञान एआय चॅटबॉटवर मिळणार आहे. तुमच्या दैनंदिन समस्यांवर आता तुम्ही या एआय चॅटबॉटद्वारे “भगवद्गीतेचा सल्ला” घेऊ शकाल. म्हणजेच, जसे तुम्ही चॅट जीपीटी प्लॅटफॉर्मवर प्रश्न विचारता तसे गीता जीपीटीवरही विचारु शकता. त्याचे उत्तर एआय चॅटबॉट भगवद्गीतेचा सल्ला घेऊन देईल.
गुगलचे सॉफ्टवेअर इंजिनियर बंगळुरूस्थित सुकुरु साई विनीत यांनी हे गीता जीपीटी विकसित केले आहे. गीता जीपीटी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट जीपीटी-३ द्वारे तुमच्या जीवनातील समस्यांना थेट भगवद्गीते मधून उत्तर देते. हा चॅटबॉट जीवनातील बहुतेक समस्यांची उत्तरे देतो आणि त्या कशा सोडवता येतील हे देखील सांगते. परंतु, तुम्ही एलोन मस्क किंवा बिल गेट्सबद्दल विचारल्यास, चॅटबॉटला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण जाईल.
What if you could talk to the Bhagvad Gita? To Lord Krishna himself?https://t.co/v6svUZ3PWV
the holy Song of God, now in your palms. Welcome to the 21st century. pic.twitter.com/VVMEWEgzzZ
— Vineet (@SaiVineet2) January 28, 2023
स्टार्ट अपही सरसावले
चॅट जीपीटी लाँच झाल्यापासून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि चॅटबॉटची लढाई तीव्र झाली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या टेक कंपन्यांनी देखील त्यांचे स्वतःचे एआय चॅटबॉट्स सादर केले आहेत.
सध्या केवळ मोठ्या टेक कंपन्याच नाहीत तर स्टार्ट-अप आणि डेव्हलपर देखील या तंत्रज्ञानावर काम करत आहेत आणि एआय चॅटबॉट्स विकसित करण्याचा विचार करत आहेत.