भिवंडी: भिवंडी तालुक्यातील केमिकल साठ्याला भीषण आज सायंकाळी आग लागली. आगीच्या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे. बोरपाडा येथे मूर्ती बनवण्यासाठी ठेवण्यात आलेल्या केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागली. या आगीत लाखोचे नुकसान झाले असून आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही.
तर ज्या गोदामात हा केमिकल ड्रम होता त्या जवळच पेट्रोल पंप असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरु आहेत.