Monday, May 5, 2025

क्रीडा

जलतरणातील 'सुवर्णकन्या' अपेक्षा फर्नांडिसची सोनेरी कामगिरी

जलतरणातील 'सुवर्णकन्या' अपेक्षा फर्नांडिसची सोनेरी कामगिरी

भोपाळ (वार्ताहर) : जलतरणातील सुवर्णकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अपेक्षा फर्नांडिस हिने शुक्रवारी सोनेरी षटकार पूर्ण करीत महाराष्ट्राची जलतरणामधील घोडदौड कायम राखली. पलक जोशीचे विजेतेपद, तसेच रिले शर्यतीमधील सुवर्णपदकासह महाराष्ट्राने दिवसभरात सहा पदकांची कमाई केली.

मुलींच्या २०० मीटर वैयक्तिक मिडले शर्यतीत मुंबईची खेळाडू अपेक्षा फर्नांडिसने येथे स्वतःचे चौथे सुवर्णपदक जिंकताना २ मिनिटे २४.९१ सेकंद वेळ नोंदविली. अंतिम शर्यतीसाठी ती सहाव्या लेनमधून पोहत होती. अंतिम फेरीत तिच्यापुढे कर्नाटकच्या तीन खेळाडूंचे आव्हान असूनही तिने शेवटपर्यंत अप्रतिम कौशल्य दाखवत विजेतेपद पटकावले.

मुलींच्या दोनशे मीटर्स बॅक स्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या चार खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी मुंबईच्या पलक जोशी

Comments
Add Comment