
भाईंदर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका खाजगी कार्यक्रमासाठी मीरा-भाईंदर शहरात सकाळी येणार असल्याने महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यानी शहारातील सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.
भाईंदर पश्चिम भागातील जिर्णोद्धार झालेल्या जैन मंदिराच्या कार्यक्रमाला तसेच जैन मुनी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी सकाळी ११ वाजता शहरात येणार होते. त्यानिमित्ताने दहिसर चेक नाका ते भाईंदर पश्चिम भागातील कार्यक्रम स्थळापर्यंतच्या सर्व विजेचे खांब आणि अनेक झाडावर त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियमा नुसार विजेचे खांब आणि झाडावर फलक लावण्यास परवानगी देण्यात येत नाही. त्यामुळे सर्व फलक अनधिकृत आहेत. दुपारी १ वाजे पर्यंत उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचले नव्हते.
दरम्यान याबाबत, महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना, शहारत फलक लावण्यास बंदी आहे. विजेचे खांब आणि झाडावर लावण्यात आलेले सर्व फलक अनधिकृत आहेत त्यावर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.