Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीबायकोचा मृतदेह घेऊन तो कित्येक किलोमीटर चालत राहिला....

बायकोचा मृतदेह घेऊन तो कित्येक किलोमीटर चालत राहिला….

ओडिशातील ही हृदयद्रावक घटना म्हणजेच माणूसकीची परिक्षा

ओडीशा: ओडीशात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. माणूसकीची परिक्षा पाहणाऱ्या या घटनेने व्यवस्थेला हादरे दिले आहेत. ओडिशातील एक व्यक्ती पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल कित्येक किलोमीटर अंतर पायी चालला. त्यावेळी काय घडलं हे वाचून तुमचं काळीज पिळवटून जाईल.

ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातील सुराडा गावातील समुलु आणि त्याची पत्नी गुरु यांची ही गोष्ट. त्याच्याकडे तिचा मृतदेह गावी नेण्यासाठी पैसे नव्हते आणि तो हतबल माणूस मृतदेह खांद्यावर घेऊन चालायला लागला. त्याला तब्बल १२५ किलोमीटरचे अंतर कापायचे होते. त्यातील कित्येक किलोमीटर अंतर तो पायी चालला.

सॅमुलू आपल्या आजारी पत्नीला उपचारासाठी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमला घेऊन आला होता. तिच्या उपचाराचा खर्च उचलता न आल्याने हा आदिवासी माणूस तिला ऑटोरिक्षाने घरी परत घेऊन जात होता. त्याला ऑटोरिक्षाने सालूर गाठायचे होते आणि तेथून दुसऱ्या वाहनाने गाव गाठायचे होते. त्याला ऑटोरिक्षा मिळाली. मात्र, वाटेतच तिची प्रकृती आणखी खालावली आणि तिने प्राण सोडला. यावेळी रिक्षाचालकाने मध्येच वाहन थांबवून त्या व्यक्तीला मृतदेहासह खाली उतरण्यास सांगितले. सॅमुलूने किमान त्याला सालुरू येथे सोडण्याची विनंती करूनही, ऑटो-रिक्षा चालकाने नकार दिला.

पुढे जाण्यासाठी हातात पैसे नसल्यामुळे तो मृतदेह खांद्यावर घेऊन गावाकडे निघाला. तो राष्ट्रीय महामार्गावरून चालत होता. वाटेत येणारे जाणारे फक्त त्याच्याकडे बघत होते पण त्याला मदत करायला कोणी थांबले नाही. शेवटी एका सुहृदयी वाटसरुने पोलिसांना याप्रकाराची माहिती दिली.

जवळील पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी तिरुपती राव आणि उपनिरीक्षक किरण कुमार यांनी धाव घेतली. पोलीस अधिकाऱ्याने त्याच्याशी बोलून सर्व तपशील गोळा केला, त्याला अन्न आणि पाणी दिले आणि मृतदेह त्याच्या गावी नेण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -