Tuesday, December 10, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेपगारवाढ रोखणा-या पोलीस अधिकाऱ्याची कल्याणमध्ये हत्या

पगारवाढ रोखणा-या पोलीस अधिकाऱ्याची कल्याणमध्ये हत्या

कल्याण : पगारवाढ रोखल्याने रोहा येथील आरपीएफच्या एका कॉन्स्टेबलने कल्याणमध्ये येऊन उपनिरीक्षकाची हत्या केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. बसवराज गर्ग असे मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर पंकज यादव असे आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे.

आरोपी पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. तर बसवराज गर्ग हे आरपीएफच्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अधिकार क्षेत्रात रोहाचा परिसर येतो. त्यामुळे त्याच्या पगारवाढीची शिफारस करण्यासाठी गर्ग यांच्या परवानगीची आवश्यकता होती.

मात्र, पंकज यादवची मागील अनेक दिवसांपासून वेतनवाढ रोखण्यात आली होती. हाच राग मनात ठेवून पंकज यादवने कल्याण रेल्वे यार्डात येऊन गर्ग यांची मध्यरात्री लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली आणि तेथून पळ काढत रोहा गाठले. याची माहिती पोलिसांना मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी पंकज यादव याला सकाळी अटक करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकरणी, डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, पंकज यादव आणि बसवराज गर्ग हे दोघे २०१० साली एकत्र काम करत होते. पंकज यादव याची बसवराज गर्ग यांनी विभागीय चौकशी केली होती. ज्यामध्ये पंकज यादव यांची ४ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे बसवराज ४ वर्षांपासून गर्गवर चिडले होते. बुधवारी दुपारी ३:३० वाजता पंकज यादव पेणहून कल्याणला आला आणि त्याने रात्री १०:४५ च्या सुमारास बसवराज गर्गची यांची हत्या करून पुन्हा पेणला निघून गेला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -