भिवंडी: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत बाळासाहेबांची शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेना नेते प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गरीब व गरजू रुग्णांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण सुद्धा करण्यात आले. शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी आमदार शांताराम मोरे माजी उपमहापौर मनोज काटेकर शिवसेना शहर प्रमुख सुभाष माने यांच्यासह अनेक बाळासाहेबांची शिवसेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.