Saturday, December 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेखडवली रेल्वे स्थानकात ईलेव्हेटरची मागणी

खडवली रेल्वे स्थानकात ईलेव्हेटरची मागणी

ईलेव्हेटर उभारण्याची मनसेची मागणी

कल्याण : खडवली रेल्वे स्थानकात ईलेव्हेटर अभावी अपंग, गर्भवती महिला आणि वृद्धांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर सरकता जिना उभारावा अशी मागणी, मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी केली आहे.

मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात. परंतु मुलभूत सुविधांच्या मानाने, हे स्थानक नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे. प्रसाधनगृहाची स्वच्छता ही तर महत्वाची समस्या आहे. स्मार्टकार्ड तिकीट प्रणाली कार्यान्वित नसल्याने अनेक प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत बराच वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे अनेकदा ट्रेन सोडावी लागते. स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या संरक्षण भिंतीमुळे, प्रवाशांना स्थानकावर जाण्यासाठी असलेला एकमेव जीना, खडतर पायऱ्यांमुळे चढण्या आणि उतरण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कित्येकदा प्रवाशी जिन्यावरून उतरताना पडतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, स्थानकावर जाण्यासाठी ईलेव्हेटर उपलब्ध नाही त्यामुळे अपंग, गर्भवती महिला आणि वृध्दांची प्रचंड गैरसोय होत आहे.

खडवली स्टेशन प्रबंधक/व्यवस्थापक नक्की काय व्यवस्थापन करतात असा संतप्त सवाल मनसेचे दिनेश बेलकरे यांनी केला आहे आणि युद्धपातळीवर काम करुन लवकरात लवकर ईलेव्हेटर उभारावे अशी मागणी देखील केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -