कल्याण: मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेसच्या डी१ एसी डब्याला आग लागली. डब्याखालून अचानक धूर आल्याने गोंधळ उडाला.
कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान हैद्राबादच्या दिशेने ही एक्सप्रेस निघाली असतांना ही घटना घडली. त्यामुळे तात्काळ गाडी थांबवून रेल्वे कर्मचारी आणि आपत्कालीन पथकाने या धुरावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे दुर्घटना टळली. आग विझवल्यानंतर सदर ट्रेन कल्याण रेल्वे स्टेशनवर आली. त्यानंतर या गाडीची पुन्हा एकदा तपासणी करून ही गाडी पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली.