राळेगणसिद्धी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. राज्यातील इतर राजकीय नेत्यांनी व सर्व स्तरांतून देखील एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना फोनवरुन शुभेच्छा दिल्या. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.
‘तुमच्या कामाच्या बातम्या वाचतो, चांगले काम करत आहात. असेच काम पुढे सुरू ठेवा. आमचा आशिर्वाद चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागे कायम आहे, असे कौतुक अण्णा हजारे यांनी केले.
‘तळागाळातून परिवर्तन होणे गरजेचे होते. तुमची जोडी चांगली काम करते. ही जोडी महाराष्ट्राला चांगली मिळाली आहे. तुमचा महाराष्ट्रासाठी एक-एक क्षण महत्वाचा आहे. तो क्षण तुम्ही राज्याच्या समाजकारणासाठी लावा, असेही अण्णा हजारे म्हणाले.