नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये मृतांचा ११ हजार २०० हून अधिक झाला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये एक भारतीय अडकल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार बेंगळुरू मधील एक व्यापारी तुर्कीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही सांगितले की ८५० लोक इस्तंबूलच्या आसपास आहेत, २५० अंकारामध्ये आहेत आणि उर्वरित देशभरात पसरलेले आहेत. दरम्यान १० भारतीय नागरिक तुर्कीच्या दुर्गम भागात अडकले असून ते सुरक्षित आहेत.
सोमवारी पहाटे झालेल्या भीषण भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये त्यापैकी एकट्या तुर्कीमध्ये ८ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास ५० हजारहून अधिक लोक जखमी झाले.
तुर्कस्तानमध्ये बिझनेस ट्रिपला गेलेला भारतीय बेपत्ता
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बेपत्ता भारतीय बेंगळुरूमधील कंपनीत काम करत होता आणि तुर्कस्तानच्या व्यावसायिक दौऱ्यावर होता. सरकार त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.
दरम्यान, तेथील बचावकर्ते ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या भीषण भूकंपानंतर भारताने पाठवलेली साहित्य आणि बचावकार्याची मदत तेथे पोहोचली आहे.