नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्जेंटिनाकडून खास जर्सी भेट म्हणून देण्यात आली आहे. फिफा विश्वचषक विजेत्या अर्जेंटिना संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीची ही जर्सी आहे. जर्सीवर लिओनेल मेस्सीसह संपूर्ण संघातील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या आहेत. मंगळवारी अर्जेंटिना एनर्जी कंपनीचे अध्यक्ष पाब्लो गोन्झालेझ यांनी भारतीय ऊर्जा सप्ताहात पंतप्रधान मोदींना ही जर्सी भेट दिली. बंगळुरू येथे भारतीय ऊर्जा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
पंतप्रधान मोदींना मेस्सीची जर्सी भेट
