Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडी'वंदे भारत'सोबत मोदी १० तारखेला 'या' प्रकल्पांचे उद्घाटन करणार

‘वंदे भारत’सोबत मोदी १० तारखेला ‘या’ प्रकल्पांचे उद्घाटन करणार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी मुंबईत दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत. सेमी-हायस्पीड स्पेशल गाड्यांबरोबरच, ते त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) एक्स्टेंशन ब्रिज आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन करणार आहेत.

दोन्ही रस्त्यांचे बांधकाम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. रेल्वे अधिकारी आणि एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी मंगळवारी या प्रकल्पाच्या तपशीलांवर चर्चा करण्यासाठी आणि लॉन्चिंगची योजना आखण्यासाठी बैठक घेतली. सर्व काही योजनेनुसार पार पडल्यास, पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून पुलाचे आणि अंडरपासचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करतील.

सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज

३.८ किमी-लांब सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड एक्स्टेंशन ब्रिज कपाडिया जंक्शनजवळून सुरू होतो आणि वाकोला जंक्शनजवळ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (WEH) वर संपतो. एमएमआरडीएने सांगितले की, सुरुवातीला पुलाचा काही भाग प्रवाशांसाठी खुला केला जाईल. संपूर्ण विस्तारित पूल सुमारे ४१५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार आहे. २०१७ मध्ये या पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि जवळपास पाच वर्षानंतरही हा पूल वाहतुकीसाठी अंशत: खुला होणार आहे.

कुरार अंडरपास

विकास प्राधिकरणाने कुरार ग्राम पादचारी व वाहन सबवेचे रुंदीकरण आणि बांधकाम पूर्ण केले आहे. अंदाजे २५ कोटी रुपये खर्चून हा अंडरपास तयार झाला आहे. तो कार्यान्वित झाल्यानंतर, मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -