Friday, January 16, 2026

कल्याणमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोजमाप शिबीर

कल्याणमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोजमाप शिबीर

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ फिजिकल मेडीसिन ॲन्ड रिहॅबिलिटेशन, महालक्ष्मी मुंबई यांच्यामार्फत मोजमाप तपासणी शिबिर पार पडले.

विशेष गरजा असणा-या अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी व बहुविकलांग असलेल्या विद्यार्थ्यांना स्नायु व सांध्यांतर्गत तीव्र दोष असल्याने अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मापानुसार साहित्य तयार करुन दिल्यास त्यांच्या शरीराची स्थिती टिकवून ठेवण्यास मदत होते. या दृष्टीकोनातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबीराचा एकूण ६२ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आणि तपासणीअंती मार्च २०२३ अखेर विद्यार्थ्यांना कॅलिपर, स्पिलींट, मॉडिफाय चेअर, कॉर्नर सिटींग, वॉकर, कृत्रिम अवयव क्रचेस, सेलेटर इ. साहित्य देण्यात येईल. या मोजमाप तपासणी शिबीराचे उद्घाटन प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी केले. यासमयी डॉ. संगिता गणवीर, समावेशित तज्ञ प्रांजल जाधव, वंदना पिंगाने, निलिमा खुंटले, बंदु घोडे, बुरुंगले, अनिता पाटील यांनी मेहनत घेतली. आय. ई. समन्वयक मिलिंद अहिरे यांनी शिबीर पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले.

Comments
Add Comment