जबलपूर (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेला सुपरस्टार रेडर अजित चौहान, पृथ्वीराज आणि साहिल पाटीलने गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाचा पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित केला. वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ५०-३७ असा तेरा गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह महाराष्ट्र संघाचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे.
महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला. दमदार सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्र संघाने पहिल्या हापमध्येच १३ गुणांची लीड घेतली होती. आपली हीच मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतरही सर्वोत्तम खेळी केली. यातून महाराष्ट्र संघाला धडाकेबाज विजयाची नोंद करता आली.
विजयाच्या प्रयत्नात असलेल्या यजमान मध्य प्रदेश संघाला दादासो पुजारी आणि अनुज गावडे यांनी रोखले. या दोघांनी अचूक पकडी करून यजमानांचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…