Tuesday, April 29, 2025

क्रीडा

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत

जबलपूर (वृत्तसंस्था) : फॉर्मात असलेला सुपरस्टार रेडर अजित चौहान, पृथ्वीराज आणि साहिल पाटीलने गत कांस्य पदक विजेत्या महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाचा पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्समध्ये सेमी फायनलमधील प्रवेश निश्चित केला. वैभव रबाडेच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र संघाने गटातील शेवटच्या सामन्यात यजमान मध्य प्रदेश संघाला धूळ चारली. महाराष्ट्र संघाने ५०-३७ असा तेरा गुणांच्या आघाडीने दणदणीत विजय साजरा केला. या विजयासह महाराष्ट्र संघाचे स्पर्धेतील पदक निश्चित झाले आहे. आता महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्यात सेमी फायनल रंगणार आहे.

महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील तिसऱ्या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत आपला दबदबा कायम ठेवला. दमदार सुरुवात करणाऱ्या महाराष्ट्र संघाने पहिल्या हापमध्येच १३ गुणांची लीड घेतली होती. आपली हीच मोहीम कायम ठेवत महाराष्ट्र संघाने मध्यंतरानंतरही सर्वोत्तम खेळी केली. यातून महाराष्ट्र संघाला धडाकेबाज विजयाची नोंद करता आली. विजयाच्या प्रयत्नात असलेल्या यजमान मध्य प्रदेश संघाला दादासो पुजारी आणि अनुज गावडे यांनी रोखले. या दोघांनी अचूक पकडी करून यजमानांचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.

Comments
Add Comment