भिवंडीत वकिलांचे धरणे आंदोलन

Share

भिवंडी: राज्य शासनाने अर्थसंकल्पात भिवंडी न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालये स्थापन करण्याची तरतूद करावी या मागणीसाठी सत्र न्यायालय स्थापना मागणी अभियोक्ता व जनआंदोलन समितीच्या वतीने भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शहरातील नागरिक व वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भिवंडी न्यायालयाची इमारत सुंदर व भव्य बांधण्यात आली आहे. मात्र या न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच पूर्णवेळ उच्च स्तर दिवाणी न्यायालय व इतर आवश्यक न्यायालय नसल्याने न्याय मिळविण्यासाठी वकील, पोलीस, पक्षकार व आरोपींना ठाणे येथे जिल्हा सत्र न्यायालयात जावे लागते.

ठाणे येथील प्रवास किचकट व खर्चिक तसेच वाहतूक कोंडीचा असल्याने ठाणे प्रवासात आरोपी, त्यांचे नातेवाईक, वकील, पोलीस व सामान्य नागरिकांना वेळ व अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतात. त्यात शारीरिक व मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेता न्यायालये स्थापन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. मात्र राज्य शासनाने अर्थ संकल्पात खर्चाची तरतूद न केल्याने भिवंडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना होऊन शकली नाही. त्यामुळे भिवंडीतील नागरिकांना न्यायासाठी ठाण्याला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

14 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago