Wednesday, July 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेकेडीएमसीच्या स्वच्छता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद

केडीएमसीच्या स्वच्छता मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात १० फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमण विभाग, फेरीवाला पथक तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘एकत्रित स्वच्छता मोहिम’ आयोजित करण्यात आलेली आहे.

त्या अनुषंगाने महापालिकेमार्फत प्रभागनिहाय रस्ते सफाई करीता नियोजन करण्यात आलेले असून संबंधित प्रभागाचे मुख्य उद्यान अधिक्षक, उप अभियंता (बांधकाम), सहाय्यक आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, मुकादम व सफाई कर्मचारी यांच्या जबाबदा-या निश्चीत करण्यात आलेल्या आहेत. या मोहिमे दरम्यान रस्ते सफाईवर विशेष भर देण्यात येणार असून यांतर्गत फुटपाथ मोकळे करणे, अनाधिकृत बॅनर्स/ होर्डींग्स हटविणे, रस्तालगत असलेले गवत काढणे, पडलेले डेब्रीज, माती, गाळ उचलणे तसेच मुख्य रस्त्यालगत असलेली झाडे छाटणे, रस्ते दुभाजक रंगविणे इ. कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती उप मुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टीन घुटे यांनी दिली.

महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार, अतिरीक्त आयुक्त मंगेश चितळे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त अतुल पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम सुरु आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -