मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रियेला सुरुवात

  169

मुंबई: मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. राज्यातील युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची ही चांगली संधी आहे.


अर्ज करण्याची मुदत २ मार्च पर्यंत असून राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुलामुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा, धाडस, कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती देणे, नावीन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. २०१५ ते २०२० या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता. लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.



कसा कराल अर्ज?



  • मुख्यमंत्री फेलोशिप २०२३ करीता अर्ज करण्यासाठी वयाची अट २१ ते २६ वर्षे इतकी आहे. हा अर्ज करणाऱ्याला ६० टक्के गुणांसह पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव असावा, असे किमान निकष आहेत.
    ऑनलाइन परीक्षा, निबंध व मुलाखत अशा त्रिस्तरीय चाचणीच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोंची निवड केली जाईल.

  • आलेल्या अर्जांमधून ६० युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग व राज्यभरातील विविध कार्यालयांमध्ये हे फेलो वर्षभर काम करतील.

  • आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदार (ॲकॅडेमिक पार्टनर) आहेत. या दोन्ही संस्थांद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील. त्यासाठी त्यांना आयआयटी, मुंबई व आयआयएम, नागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल.


मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची तपशीलवार माहिती


https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP या संकेतस्थळावर उपलब्ध असून काही शंका असल्यास 8411960005 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,